News Updates : महत्वाच्या बातम्या , एक नजर , गल्ली ते दिल्ली

1. दुबईत बसच्या अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू. मृत्युमुखींची संख्या ८ वर पोहोचण्याची शक्यता. चार जखमींना डिस्चार्ज देण्यात आले. तीन जणांवर राशीद हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू.
2. मुंबईः मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आज कोर्टात सुनावणी. उपस्थित राहण्यासाठी साध्वी प्रज्ञा ठाकूर भोपाळहून मुंबईला रवाना.
3. यवतमाळः एस.टी. बसमध्ये नवजात बाळाला जन्म देऊन, आई पसार झाल्याने खळबळ.
4. वायनाड लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राहुल गांधी आज पहिल्यांदा मतदारसंघात जाणार.
5. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ दौऱ्यावर जाणार. सायंकाळपर्यंत कोचीला पोहोचणार.
6. कोल्हापूर: आरके नगर परिसरातील प्रणव सुनील जरग या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. दहावीच्या निकालाच्या भीतीने त्याने आत्महत्या केल्याची चर्चा.
7. अकोला : रेल्वे स्थानकावर एका 45 वर्षीय व्यक्तीची हत्या. पोलीस घटनास्थळी दाखल
8. नाशिक: नाशिकरोड आगरटाकली राहुलनगर येथे प्रवीण गायकवाड मृत्यू प्रकरणी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
9. आंध्र प्रदेश – चित्तूर जिल्ह्यात भरधाव कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू, तीन जण जखमी
10. आर्वी (वर्धा) : पोलिसांच्या वाहनाला अपघात होऊन उपनिरीक्षकांसह 6 जण जखमी झाले आहेत.
11. महागाव : घरावर वीज कोसळल्याने करंजखेड येथील आत्माराम मरेजी ठाकरे (69) यांचा मृत्यू