Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमच्या विजयासाठी ज्या दृश्य – अदृश्य हातांनी मदत केली त्या सर्वांचे मी दृश्यपणे तसेच अदृश्यपणे आभार मानतो : उद्धव ठाकरे

Advertisements
Advertisements
Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाबाबत आमचं ठरलंय, याची चिंता कुणीही करण्याची गरज नाही असे उद्धव म्हणाले. मी हे हसत आणि मिष्किल शैलीत म्हणत असलो तरी खरंच आमचं ठरलंय. ते तुम्हाला माहीत नाही, आम्हाला मात्र माहीत आहे, असे उद्गार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी कोल्हापुरात बोलताना काढले . आमच्या विजयासाठी दृश्य तसेच अदृश्य हातांनी मदत केली आहे. त्या सर्वांचे मी दृश्यपणे तसेच अदृश्यपणे आभार मानतो असेही उद्धव म्हणाले.

Advertisements

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. आज कोल्हापुरात त्यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अंबाबाईचं दर्शन घेतलं

Advertisements
Advertisements

आपली माणसं समजून हक्कानं मागणं म्हणजे नाराजी व्यक्त करणे नाही, जे मागायचं आहे ते आम्ही हक्कानं मागतोय, ज्या इच्छा व्यक्त करायला पाहिजे त्या करतोय, असे म्हणत  उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला उपसभापतीपद मिळावे या मागणीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. दोन-चार पदं मिळावीत म्हणून आम्ही युती केली नसून, ती हिंदुत्वासाठी केली आहे, असं म्हणत, आमची युती अधिक भक्कम झाली असून ती कधीही तुटणार नाही असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!