Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तब्बल १७ वर्षांनंतर पोलिसांकडून पार्थिवावर अंत्यसंस्कार !! कुठे आणि का ? ते पहा ….

Advertisements
Advertisements
Spread the love

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नेहमी सतत टीका होताना पहावयास मिळते. मात्र, पुण्यातील पोलिसांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविण्याचे काम केले असून कोथरुड येथे मृत्युमुखी पडलेल्या १६ वर्षाच्या तरुणाच्या पार्थिवावर तब्बल १७ वर्षानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

Advertisements

याबाबत माहिती देताना कोथरुड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी म्हणाल्या, कोथरुडमध्ये सन २००२ साली एमआयटी कॉलेजच्या मागील बाजूस निखिल रणपिसे (वय १६) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. याचदरम्यान निखिलचा मृतदेह कोथरुड पोलीस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात ठेवण्यात आला होता.

Advertisements
Advertisements

दरम्यान, न्यायालयाने पार्थिवाची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली. त्यावर निखिलच्या कुटुंबीयांचा शोधून घेऊन त्यांना अंत्यसंस्काराबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी कोथरुड पोलिसांच्या मदतीने विद्युत दाहिनीत निखिलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!