News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

1. पुणेः भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना मेक्सिकन सरकारचा ‘ऑर्डन मेक्सिकाना’ पुरस्कार प्रदान.
2. महाराष्ट्रात यंदा सरासरीच्या ९५ टक्के पावसाची शक्यता – ज्येष्ठ हवामान अभ्यासक डॉ. रामचंद्र साबळे यांचा अंदाज
3. नागपूरः ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यावर भरः नितीन गडकरी.
4. दिल्लीः राजनाथ सिंह यांनी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.
5. दिल्लीः अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला.
6. दिल्लीः संविधान आणि भारतीय लोकांसाठी आपण लढत आहोत हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ध्यानात ठेवावेः राहुल गांधी.
7. लोकसभेच्या ३०० जागा जिंकल्यानं देशावर मनमानी करणार असे जर पंतप्रधानांना वाटत असेल तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाहीः असदुद्दीन ओवेसी.
8. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ७ जूनपासून दोन दिवसाच्या वायनाड दौऱ्यावर .
9. अमेठीः सुरेंद्र सिंह हत्याप्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक.
10. अमेरिका: व्हर्जिनीयामध्ये एका इसमाचा बेछूट गोळीबार , ११ ठार, ६ जखमी
11. मुंबईत चार तासांपासून राष्ट्रवादीच्या मॅरेथॉन बैठका, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा
12. कोल्हापूर : शाहू समाधीस्थळाबाबतचे काम रोखले, महापालिका आणि नागरिकांमध्ये पुन्हा वाद, पोलीस बंदोबस्तात बैठक
13. औरंगाबाद : फुलंब्री तालुक्यातील पानवाडी या गावातील 6 महिला पाणी काढताना विहिरीत पडल्या; त्यांना नागरिकांनी बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले असून उपचार सुरू.
14. मुंबईः ज्येष्ठ समीक्षक म. सु. पाटील यांचे निधन
15. नवी दिल्लीः राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे २० जूनला संसदेत अभिभाषण, ४ जुलैला आर्थिक सर्वेक्षण तर अर्थसंकल्प ५ जुलैला सादर होणार, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती