मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा ३० मे रोजी शपथविधी

The President will administer the oath of office and secrecy to the Prime Minister and other members of the Union Council of Ministers at 7 pm on May 30, 2019, at Rashrapati Bhavan
— President of India (@rashtrapatibhvn) May 26, 2019
नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा होईल. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील याचवेळी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाकडून रविवारी सायंकाळी ही माहिती जाहीर करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. तत्पूर्वी शुक्रवारी मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रपतींकडे राजीनामे सुपूर्द केले.
मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०३ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३५३ जागा मिळाल्या आहेत. मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला मंत्रीपद मिळतं याकडे सर्वांचं लभ आहे.