IAS विरुद्ध IPS च्या लढाईत आयपीएस पराभूत , भाजपच्या आयएएस जिंकल्या …

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक हे भुवनेश्वर येथून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. भाजपच्या अपराजिता सारंगी यांनी त्यांचा २३,८३९ मतांनी पराभव केला. ही निवडणूक आएएस विरुद्ध आयपीएस अशी होती. सारंगी यांची भारतीय प्रशासकीय सेवेतली ११ वर्षांची सेवा शिल्लक असताना २०१८ मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राजीनामा दिला त्यावेळी त्या केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या सहसचिव होत्या. भाजपने सारंगी यांना उमेदवारी दिली तेव्हा बीजू जनता दलाने विद्यमान खासदार प्रसन्न कुमार पटसानी यांचं तिकीट कापून अरुप पटनायक यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये पटसानी १ लाख ८९ हजार ४७७ मताधिक्याने जिंकले होते.