लोकसभा २०१९ : मनेका काकूने दिला राहुल गांधी यांना सल्ला

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजप नेत्या मनेका गांधी यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे. राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही, अशी टीका करतानाच राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा, असा सल्ला मनेका गांधी यांनी राहुल यांना दिला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मनेका यांनी ही टीका केली आहे. मनेका गांधी या उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी बसपाचे उमेदवार चंद्रभद्र उर्फ सोनू सिंह यांचा १४ हजार मतांनी पराभव केला आहे.