Pakistan : डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पाकिस्तानात ४३७ मुलांना एड्सची बाधा

पाकिस्तानातील मुलांना एड्स झाल्याचे प्रकरण सध्या जागतिक स्तरावर बातम्यांचा विषय झाले आहे . पाकिस्तानातील एका डॉक्टरच्या क्रौर्यामुळे ४०० पेक्षा जास्त मुलांना HIV ची लागण झाली आहे. डॉक्टरला एड्स असल्याने त्याने वापरेल्या सीरिंज पुन्हा पुन्हा वापरल्या. या प्रकारमुळे सुमारे ५०० जणांना HIV ची लागण झाली. ज्यामध्ये ४३७ मुलांचा समावेश आहे. पाकिस्तानातल्या रातोडेरो या ठिकाणी ही घटना घडली आहे. डॉक्टर मुज्जफर गांघरो असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. डॉक्टर मुज्जफर घांगरो हा चाईल्ड स्पेशालिस्ट आहे. या डॉक्टरमुळे एचआयव्हीची लागण होऊन आमची मुलं दगावली असा आरोप किमान दहा कुटुंबांनी केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
काही महिन्यांपूर्वी फातिमा इमान या मुलीला ताप भरला. त्यामुळे तिचे वडील तिला दवाखान्यात घेऊन गेले. फातिमा अवघी सोळा महिन्यांची होती. तिची तपासणी केल्यावर स्थानिक डॉक्टरांनी तिची HIV चाचणी करण्याचा सल्ला दिला. १ मार्च रोजी तिच्या HIV टेस्टचे निदान समोर आले. ज्यामध्ये फातिमाला HIV असल्याची माहिती समोर आली. सय्यद शाह यांची फातिमा ही पहिलीच मुलगी. तिला HIV ची लागण झाल्याची माहिती समोर आल्यावर हे समजलं की रातेडेरो या ठिकाणी सुमारे ५०० जणांना HIV ची लागण झाली आहे. यामध्ये सुमारे ४३७ मुलांचा समावेश आहे.
या सगळ्या प्रकरानंतर आणि दहा कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर डॉक्टर मुज्जफर गांघरो या बालरोग तज्ज्ञाला अटक केली. मी हे काहीही जाणीवपूर्वक केले नाही असे मुज्जफर गांघरोने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. मात्र डॉक्टरमुळे चार मुलं दगावली हा आरोप या मुलांच्या कुटुंबीयांनी केला आहे. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.