Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ITR Deadline: आयकर विभागाकडून आयटीआरसाठी ४५ दिवसांची जादा मुदत जाहीर…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : आयकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंतच्या कमाईसाठीची आयकर रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ही अपडेट जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. ३१ जुलै २०२५ ऐवजी नवीन तारखेमुळे करदात्यांना अतिरिक्त ४५ दिवसांचा वेळ मिळाला आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार यावेळी आयटीआर फॉर्ममध्ये (जे मूल्यांकन वर्ष २०२५-२६ साठी आहेत) अनेक बदल करण्यात आले आहेत. सिस्टममध्ये हे बदल लागू करण्यासाठी आणि आयटीआर दाखल करण्यासाठी ऑनलाइन टूल्स (युटिलिटिज) तयार करण्यासाठी अधिक वेळ लागत होता. म्हणून, लोकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून तारीख वाढवण्यात आली आहे.

Advertisements

कोणती कर प्रणाली निवडायची?

नवीन कर प्रणाली (New Regime): ही कर प्रणाली आता डीफॉल्ट आहे. म्हणजे, जर तुम्ही काहीही सांगितलं नाही, तरी तुमचा परतावा या प्रणालीनुसार मोजला जाईल.

Advertisements
Advertisements

जुनी कर प्रणाली (Old Tax Regime): पगारदार व्यक्ती, जर त्यांना हवx असेल तर, नवीन अंतिम मुदतीपर्यंत (१५ सप्टेंबर २०२५) आयटीआर दाखल करताना जुनी कर प्रणाली निवडू शकतात. यामध्ये अनेक वजावटी उपलब्ध आहेत, जसं की एचआरए, व्याज कपात (गृहकर्ज) इत्यादी. लक्षात ठेवा की जर तुम्ही अंतिम मुदतीनंतर (म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ नंतर) आयटीआर दाखल केला (ज्याला ‘बिलेटेड रिटर्न’ म्हणतात), तर तुम्ही फक्त नवीन कर प्रणालीमध्येच रिटर्न दाखल करू शकता. जुनी प्रणाली निवडण्याचा पर्याय राहणार नाही.

‘१२ लाखांपर्यंत कर नाही’बद्दल काय?

येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. सरकारनं अलीकडेच जाहीर केलंय की २०२५-२६ आर्थिक वर्षात (म्हणजे १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ पर्यंतचे उत्पन्न) १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, परंतु हा नियम सध्याच्या आयटीआर फाइलिंगवर (आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी) लागू होत नाही. ही सुविधा पुढील वर्षी उपलब्ध असेल, जेव्हा तुम्ही एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ पर्यंतच्या उत्पन्नाचे रिटर्न भराल त्यावेळी तुम्ही यानुसार रिटर्न भरू शकता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!