IndiaFireNewsUpdate : हैदराबादमध्ये भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू , ७ लहान मुलांचा समावेश

हैदराबाद : हैदराबाद मध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच्या घटनेत एकूण 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारमिनार भागात ही आगीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कमीत कमी 9 जण भाजले असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या दुर्घटनेत प्रल्हाद, मुन्नी, राजेंदर मोदी, समुत्रा, शीतल, वर्षा, पंकज, रजनी यांचा तसेच हमेय, इद्दू, ऋषभ, आरुषी, इराज, प्रथम या छोट्या मुलांचाही सावेश आहे. प्रथम हा मुलगा तर अवघा एका वर्षांचा होता. तर इराज नवाचा मुलगा दोन वर्षांचा होता. मृत्यू झालेली आरूषी नावाची मुलगी अवघ्या तीन वर्षांची होती. या आगीत ७ लहानग्यांचा मृत्यू झाला आहे.
घटना नेमकी कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार विवारी सकाळी ही आग लागली आहे. सर्वांत अगोदर चारमिनारच्या बाजूला असलेल्या दागिन्यांच्या दुकानात ही आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या मजल्यावर आग लागली होती. ही इमारत एकूण तीन मजल्यांची होती. याच इमारतीत दागिन्यांचे दुकान होते.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लागले दोन तास
ही घटना समोर येताच आग विझविण्यासाठी एकूण 11 अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. एकूण 70 अग्नीशामक दलाच्या जवानांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण दोन तास लागले.
केटी रामराव काय म्हणाले?
दरम्यान, ही घटना समोर येताच भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामाराव यांनी मृतांप्रती संवेदना व्यक्त केल्या. ही घटना ऐकून मला धक्काच बसला. या दुर्घनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. तर जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.