WorldNewsUpdate : डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन जिहाद्यांना दिली व्हाईट हाऊसच्या सल्लागार पदाची संधी ….

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाचे आरोप असणाऱ्या दोघांना थेट व्हाईट हाऊसच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. इस्माईल रॉयर आणि शेख हमजा असे या दोघांची नावे आहेत. या निर्णयाचा खुलासा सर्वप्रथम लॉरा लूमर या पत्रकाराने एक्सवर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रॉयर हे दहशतवादाच्या संबंधित आरोपांखाली 13 वर्षे तुरुंगात राहिलेले आहेत. रॉयर यांच्यावर दहशतवादी कृतींमध्ये सहभागी झाल्याचा आरोप झाला होता. यामध्ये अमेरिकेविरोधात युद्धाचा कट रचणे, 2003 साली अल कायदा, लष्कर ए तैयबा या दहशवतादी संघटनांना मदत करणे आदी आरोपांचा समावेश आहे.
शस्त्रांच्या उपयोगांना प्रोत्साहन देण्याचा गुन्हा केला होता मान्य
वॉशिंग्टन पोस्टनेही यावर सविस्तर वृत्त दिले आहे. 2004 साली इस्माइल रॉयर यांनी शस्त्र तसेच स्फोटकं यांचा उपयोग करण्यासाठी सहाय्य पुरवणे तसेच शस्त्रांच्या उपयोगांना प्रोत्साहन देण्याचा गुन्हा मान्य केला होता. याच कारणामुळे त्यांना 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी एकूण 13 वर्षे तुरुंगात काढले होते.
1992 साली स्वीकारला होता मुस्लीम धर्म….
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार रॉयर यांनी पारंपरिक इस्लामी विद्वानांसोबत धर्मशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. तसेच एका दशकापेक्षा जास्त काळ त्यांनी ना-नफा ना-तोटा तत्कावर काम करणाऱ्या इस्लामी संस्थांसोबतही त्यांनी काम केलेलं आहे. 1992 साली त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. रॉयर यांचे लेखन अनेक भाषांत प्रकाशित झालेले आहे.
इस्माईल रॉयर नेमके कोण आहेत?
इस्माईल रॉयर यांचे वडील फोटोग्राफर तसेच शिक्षक होते. सेंट लुईस येथे रॉयर यांनी आपले बालपण घालवले. 1092 साली इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वत:चं रान्डेल टोड रॉयर हे नाव बदलून इस्माईल रॉयर असं नाव ठेवलं.
शेख हमजा यूसुफ कोण आहेत
शेख हमजा यूसुफ हे हे कॅलिफोर्नियाच्या जैतुना महाविद्यालयाचे सहसंस्थापक आहेत. युसुफ दहशतवादी राहिलेला आहे. पत्रकार लॉरा लुमर यांच्यानुसार हमजा युसुफ हा हमास तसेच मुस्लीम ब्रदरहुड या संघटनांशी जोडलेला आहे.