Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बैठकीच्या वेळी अनुपस्थिती , ‘जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता’; म्हणत काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेते भडकले !!

Spread the love

नवी दिल्ली :  पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी सरकारला समर्थन जाहीर केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने आता लक्ष्य केले. काँग्रेसने सोशल मीडिया हॅण्डल एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामुळे आता भाजपचेही नेतेही चांगलेच संतापले आहेत.

काँग्रेसच्या एक्स हॅण्डलवर एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोत व्यक्ती दिसत नसली तरी हा ड्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी घातलात, तसाच आहे. काँग्रेसने उल्लेख न करता पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. या फोटोवर मोठ्या अक्षरात गायब (बेपत्ता) लिहिलेलं आहे. त्याचबरोबर फोटो पोस्ट करताना म्हटलं आहे की, जबाबदारीच्या वेळी बेपत्ता.

भाजप नेत्यांचा संताप…

काँग्रेसने केलेल्या या ट्विटवर भाजपच्या नेत्यांनी टीका केली आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक पोस्ट करत म्हटलं आहे की, ‘शीर धडापासून वेगळं असा फोटो वापरून कोणत्याही शंका गडद केली आहे. हे फक्त राजकीय विधान नाहीये. हे मुस्लीम मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी आणि पंतप्रधानांच्या विरोधात एक पडद्याआडून केलेली चिथावणी आहे.’

‘राहुल गांधी अनेक वेळा पंतप्रधान मोदींविरोधात हिंसेला चिथावणी दिली आहे आणि ते योग्य ठरवलं आहे. पण, काँग्रेस काही यशस्वी ठरली नाही. कारण पंतप्रधानांच्या पाठीशी लाखो भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद आहे’, असे मालवीय म्हणाले.

दरम्यान भाजपचे खासदार अनुराग ठाकूर म्हणाले, ‘काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांची अशी काय कमजोरी आहे की, त्यांना पाकिस्तानची भाषा बोलण्याची गरज पडते? ते पाकिस्तानचं समर्थन का करत आहेत? त्यांना भारतीयांच्या हत्या झालेल्या बघून राग येत नाही का?’, असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला.

‘काँग्रेस कोणासोबत उभी आहे, भारतासोबत की, पाकिस्तानसोबत? सर्जिकल स्ट्राइक केला, त्यावेळीही काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले होते. आताही थोडा काळ गेला आणि काँग्रेसने भारतावरच प्रश्न उपस्थित करणे आणि पाकिस्तानची बाजू घेणं सुरू केलं आहे’, अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली.

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!