Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MIM News Update : महाविकास आघाडीची प्रतीक्षा संपली, एमआयएमने घेतला मोठा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात…

Spread the love
  • औरंगाबाद :  धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन करणारा पक्ष असा होणारा आरोप टाळण्यासाठी एम आय एम ने महाविकास आघाडीशी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु त्याचे कुठलेही उत्तर न आल्यामुळे किंवा कोणताही निर्णय न झाल्यामुळे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आता एकला चलो रोज चलो रे चा नारा दिला आहे. किती जागांवर निवडणुका लढवायच्या याची तयारी झाली असून पुढील आदेशासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या आदेशाची प्रतीक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान आता सगळं संपलं आहे. महाविकास आघाडीसोबत चर्चा केली, पत्र लिहले. पण आता आमचे जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथेही महाविकास आघाडीने उमेदवार दिले आहेत. आमचीदेखील यादी तयार आहे. काँग्रेसचे नाना पटोले, अमित देशमुख यांच्यासोबत चर्चा झाली होती. युती असल्याने आम्ही चर्चा करू असे ते म्हणाले होते,” अशी माहिती जलील यांनी दिली.

महाविकास आघाडी बरोबर झालेल्या चर्चेचा आम्हाला कोणताही  फायदा झाला नाही. मला सुप्रिया सुळे यांचा फोन आला होता. शिवसेनेच्या नेत्यांसोबत बोललो होतो. शिवसेनेच्या ज्या नेत्याशी चर्चा झाली, त्याचं नाव जाहीर करणार नाही. मात्र शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. नाना पटोले यांच्यासोबत चर्चा झाली होती. वरळीच्या एका हॉटेलमध्ये आमची भेट झाली होती. मी नांदेड लोकसभा लढणार म्हटल्यावर सर्व जागे झाले. थेट ओवैसी यांना फोन करण्यात आला. दिल्लीतील नेते थेट ओवैसी यांच्या संपर्कात होते. मी तीन वेळा महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटलो, अशीही माहिती जलील यांनी दिली.

ज्या ठिकाणी आम्ही चांगली कामगिरी केलेली आहे, त्याच जागा आम्ही मागत आहोत. भिविंडी, मालेगाव, मुंब्रा यासारख्या जागा मागितल्या होत्या. आम्ही 15 पेक्षा कमी जागा मागितल्या होत्या. ते किती जागा द्यायला तयार आहेत की नाही, याबाबत त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते पण याउलट आमच्या उमेदवाराविरोधात त्यांनी मुस्लीम उमेदवार दिले आहे, अशी खदखदही जलील यांनी बोलून दाखवली.

ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे

काही दिवासांपूर्वी एमआयएमची जरांगे यांच्यासोबतही चर्चा झाली होती. याबाबत बोलताना जरांगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली होती. एका जातीला सोबत घेऊन जाणार नाही, असे ते म्हणाले होते. जिथे आम्ही जिंकणार आहोत त्या ठिकाणी उमेदवार देणार आहोत. मी ओवैसी यांच्या आदेशाची वाट पाहात आहे. ओवैसी यांची टीम सर्वेक्षण करत असून ते सांगतील त्या जागा आम्ही लवढवणार आहोत, अशी माहिती जलील यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!