Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

व्यवस्थेचा विजय असून लोकशाहीचा पराभव , काँग्रेसची निकालावर पहिली प्रतिक्रिया, भाजपाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप….

Spread the love

नवी दिल्ली : हरियाणामधील सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष पाहून यावेळी हरियाणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार, असा अंदाज व्यक्त केला जात असताना आजच्या मतमोजणीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पराभवाबाबत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. हरियाणातील निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच एका वाक्यात या निवडणुकीचं विश्लेषण करायचे झाल्यास, हा व्यवस्थेचा विजय असून लोकशाहीचा पराभव आहे. हा निकाल आम्हाला मान्य नाही, असे म्हटले आहे.

निकालावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपाकडून ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. हिसार, महेंद्रगड आणि पानिपत जिल्ह्यांमधून आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. काही ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के असल्याचे आमच्या उमेदवारांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ईव्हीएमची बॅटरी ९९ टक्के आहे, त्या जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. ज्या ईव्हीएमच्या तक्रारी नाहीत, त्यांच्या बॅटरी ६० ते ७० टक्के आहेत, असे काँग्रेसच्या उमेदवारांकडून सांगण्यात येत असल्याचे , पवन खेरा यांनी सांगितलं. तसेच या सर्व तक्रारी घेऊन आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३७ जागांवर विजय मिळवला आहे. याशिवाय भारतीय लोकदल पक्षाने २ तर अपक्षांना ३ जागांवर विजय मिळाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!