ElectionNewsUpdate : भाजपमध्ये तिसऱ्यांदा कमळ फुलले , अवघ्या तासाभरात पडला उलटा फेर , काँग्रेसला विजयाने दिली हुलकावणी ….

चंढीगड : हरियाणा विधानसभेमध्ये पुन्हा एकदा भाजपने बाजी मारली असून जवळपास 49 जागा जिंकल्या आहेत. भाजपने बहुमताचा 46 हा आकडा गाठला. तर काँग्रेसला 36 जागांवर समाधान मानावे लागत आहे. हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करत भाजप तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनामुळे हरियाणात भाजपविरोधात वातावरण असल्याचे बोलले जात होते . सगळ्या एक्झिट पोलमध्येही भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण सगळ्या शक्यता आणि अंदाज खोटे ठरवत हरियाणात भाजपने घवघवीत यश मिळवले आहे.
निकालात सकाळच्या सत्रात काँग्रेस आघाडीवर होती, पण नंतर भाजपने मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने हरियाणाच्या भाजपचा हा पहिला मोठा विजय आहे. हरियाणाच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी विजयादशमीच्या दिवशी 12 ऑक्टोबरला होऊ शकतो. आत्तापर्यंत संभाव्य मंत्रिमंडळाला अंतिम रूप दिल्यानंतर तारीख ठरवली जाईल, मात्र 12 तारखेला शपथ घेणार असल्याची माहिती आहे. वास्तविक, गेली 10 वर्षे हरियाणात भाजपची सत्ता होती. अशा स्थितीत अँटी इन्कम्बन्सीसह अनेक बाबी समोर आल्याने भाजपचे नुकसान होताना दिसत होते. पण भाजपने हरियाणा निवडणुकीच्या 7 महिने आधी अशी खेळी केली, ज्यामुळे काँग्रेस अडचणीत आली.
खट्टर यांना 7 महिन्यांपूर्वी हटवण्यात आले
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 7 महिने आधी भाजपने अचानक तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना पदावरून हटवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. खरे तर भाजपने 2019 मध्येही खट्टर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपला बहुमत मिळाले नव्हते. मात्र, जेजेपीच्या पाठिंब्याने भाजपला सरकार स्थापन करण्यात यश आले.
2024 मध्ये भाजपला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे निवडणुकीच्या 7 महिने आधी खट्टर यांना हटवून नायबसिंग सैनी यांच्याकडे राज्याची कमान सोपवण्यात आली. सैनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हरियाणा विधानसभेची निवडणूक लढवली आणि एका नव्या चेहऱ्याने जनतेसमोर हजर झाले. नायबसिंग सैनी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात जल्लोष
हरियाणात भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं महाराष्ट्रात भाजपचा जल्लोष सुरू झालाय. हरियाणातल्या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. लोकसभेतल्या फेक नरेटीव्हचं उत्तर आता थेट नरेटीव्हनं दिलंय, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. आता महाराष्ट्रातही महायुतीचा असाच विजय होईल, असा भाजपला विश्वास वाटतोय. लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्यानंतर भाजपचा हरिणाच्या रुपानं पहिलाच मोठा विजय आहे. तसंच जम्मू-काश्मीरमध्येही भाजपची सत्ता आली नसली तरी तिथं त्याच्या जागांमध्ये मात्र वाढ झालीय.
राजकीय अभ्यासक आणि निवडणूकपूर्व मतांचे कल या साऱ्याचा अंदाज चुकवत भाजपाने तिसऱ्यांदा हरयाणात विजय संपादन केला. सुरूवातीला जोरदार उसळी मारणाऱ्या काँग्रेसला अवघ्या दोनच तासात भाजपाने पिछाडीवर सोडले आणि मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर भाजपाने यशस्वी घोडदौड केल्याचे दिसले. हरयाणात सध्याच्या स्थितीनुसार, अंतिम निकालात भाजपा ९० पैकी ५०च्या जवळपास जागा जिंकेल असे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. भाजपाचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. पण अखेर हरयाणात भाजपाने दमदार कामगिरी केली. या विजयाचे सगळे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी व्यक्त केल्या.
#WATCH | Kurukshetra: Haryana CM Nayab Singh Saini says "I want to thank the 2.80 crore people of Haryana for putting a stamp on the works of BJP for the third time. All this is only because of PM Modi. Under his leadership, we are moving forward. He spoke to me and gave his… pic.twitter.com/jPmMecyA8D
— ANI (@ANI) October 8, 2024
“मी लाडवा आणि हरयाणाच्या २ कोटी ८० लाख लोकांचे आभार व्यक्त करतो. हरयाणातील या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. हा विजय म्हणजे एका अर्थाने मोदीजींनी राबवलेल्या विविध योजनांवर शिक्कामोर्तबच आहे. मी राज्यपाल महोदयांकडून प्रमाणपत्र घेईन आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या ज्योतिसर मंदिरात जाऊन दर्शन घेईन. हरयाणाच्या लोकांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास दाखवला आहे. आम्ही यापुढेही मोदीजींच्या नेतृत्वाखाली पुढील वाटचाल करू. तिसऱ्यांदा हरयाणाच्या जनतेने भाजपाची निवड केली आहे. पंतप्रधान मोदींच्यामुळेच हे शक्य झाले. मोदीजींना मला फोन केला आणि मला शुभाशीर्वाद दिले. माझ्या राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी बांधव आणि युवा वर्ग असाच माझ्या पाठिशी कायम उभा राहिल याची मला खात्री आहे,” असे हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले.