News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर , महत्वाच्या बातम्या, सहाव्या टप्प्यात ५९ जागा जागांसाठी उद्या मतदान

उद्या दिनांक १२ रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९ जागा जागांसाठी मतदान होत असून त्यात बिहार (८) हरयाणा (१०) झारखंड (४) मध्य प्रदेश (८) उत्तर प्रदेश (१४) पश्चिम बंगाल (८) आणि दिल्लीतील ७ जागांसाठी मतदान होत आहे .
मुंबई: पावसाळी अधिवेशन पुन्हा मुंबईत होणार; राज्यपालांनी काढली अधिसूचना. १२ जूनपासून सुरू होणार अधिवेशन.
पालघरजवळ मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 2 कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात, ६ ठार .
गेल्या पाच वर्षांच्या काळात युवकांना रोजगार मिळाला नाही – प्रियांका गांधी
जयपूर- अलवार बलात्कार प्रकरणाच्या विरोधात भीम सेनेचं आंदोलन
जालना : वाळूचा अवैध उपसा करताना ढिगाऱ्याखाली दबल्याने ऋषिकेश पाचरणे या युवकाचा मृत्यू; भोकरदन तालुक्यातील चोऱ्हाळा येथील घटना
सोलापूर -वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार, वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र देणार असल्याची मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मुंबईः जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, कंपनी वाचविण्यासाठी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी. २३ मेनंतर हा विषय केंद्रापर्यंत पोहोचवू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबईः राज्य सरकार दुष्काळी उपाययोजनांबाबत गंभीर नाही. त्यामुळे आता राज्यपालांनीच राज्य सरकारला ठोस पावले उचलण्याचे निर्देश देऊन दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
शीखविरोधी दंगल प्रकरणी ‘हुआ तो हुआ’ असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी माफी मागितली, आपली हिंदी चांगली नसल्याचं ते म्हणाले.
अहमदनगरः पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळ दुचाकीचा अपघात. तीन वर्षांच्या मुलीसह वडिलांचा मृत्यू. तर, आई आणि एका नातेवाईकाची प्रकृती चिंताजनक.