भारतीय हद्दीत कराचीमार्गे आलेले ‘ते’ विमान पाकचे नव्हे जाॅर्जीयाचे…

पाकिस्तानच्या हद्दीतून आज चुकीच्या मार्गाने भारतीय हद्दीत विमान दाखल झाल्याने भारतीय हवाई दलाने तत्काळ कारवाईचे पाऊल उचलत हे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यास भाग पाडले.
दरम्यान, हे विमान पाकिस्तानचे असल्याचे वृत्त काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवले होते. त्याचा इन्कार करत हे मालवाहू विमान जॉर्जियाचे असल्याचे व कराचीतून दिल्लीला येत होते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. हे विमान निर्धारित हवाईमार्गाऐवजी चुकीच्या मार्गाने का आणण्यात आले, याबाबत पायलटची कसून चौकशी सुरू आहे.
जय हिंद
Thanks for comment . keep in touch