BJPNewsUpdate : संघाविषयी असे काय बोलले नड्डा की ज्याची होते आहे चर्चा …

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत एक विधान सध्या चर्चेत आहे. एका इंग्रजी वृत्त पत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्वयंसेवक संघाबाबत नड्डा म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात भाजप चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती कारण त्यावेळी आमचा पक्ष छोटा होता. पण आता आमचा पक्ष मोठा झाला आहे, आम्ही अधिक सक्षम झालो आहोत त्यामुळे आम्ही आता स्वत: पक्ष चालवू शकतो.
या मुलाखतीमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना विचारण्यात आले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील आणि आताच्या काळात भाजप चालवण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका कशी बदलली आहे.
यावर नड्डा यांनी उत्तर दिले की, “सुरूवातीला आमचा पक्ष छोटा असेल, थोडा अक्षम असेल त्यामुळे आरएसएसची गरज पडायची. पण आज आमचा पक्ष मोठा झाला आहे. आम्ही आता सक्षम झालो आहोत. त्यामुळे आम्ही आता स्वत: पक्ष चालवू शकतो.
भाजपला आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही का? या प्रश्नाला उत्तर देताना नड्डा म्हणाले, “हे बघा आमचा पक्ष आता मोठा झाला आहे. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या भूमिका आणि कर्तव्ये आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सामाजिक आणि सांस्कृतिक संंघटना आहे. तर दुरसीकडे आम्ही एका राजकीय संघटना आहे. त्यामुळे आरएसएसची गरज संपली म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. आरएसएस एक वैचारिक आघाडी आहे. ते वैचारिक दृष्ट्या त्यांचे काम करत आहेत आणि आम्ही आमचे. त्यामुळे पक्षाची कामे आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडत आहोत. आणि राजकीय पक्षांनी असेच काम केले पाहिजे.”
दरम्यान याच मुलाखतीमध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा पुढे म्हणाले की, मथुरा आणि वाराणसीच्या वादग्रस्त जागांवर लेगेचच मंदिरे बांधण्याची भाजपची सध्या कोणतीही योजना नाही.