प्रियांका म्हणाल्या , यांच्यापेक्षा कायर , कमजोर पंतप्रधान मी आयुष्यात पहिला नाही ….

‘यांच्यापेक्षा घाबरट, यांच्यापेक्षा कमकुवत पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत पाहिलेला नाही’. प्रसारमाध्यमांवर जोरजोरात प्रचार केल्याने राजकीय बळ वाढत नाही असा प्रहार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. प्रतापगढ येथील सभेत त्या बोलत होत्या.
एका प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं बिरूद मिरवत, मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता असं वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन गदारोळ निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते मोदींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत असून सतत हल्ला करत आहेत. गुरुवारी प्रियंका गांधी यांनी प्रतापगढ येथील एका प्रचारसभेदरम्यान बोलताना पुन्हा नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
प्रियंका गांधींनी पुढे म्हणाल्या कि, ‘जेव्हा तुम्ही जनतेला सर्वस्व मानता तेव्हाच राजकीय बळ वाढतं. जनतेचं म्हणणं ऐकण्याची, त्यांच्या समस्या सोडवण्याची तसंच विरोधकांचं म्हणणं ऐकून घेण्याची ताकद असली पाहिजे’. यावेळी प्रियंका गांधी यांनी उपस्थितांना सांगितलं की, ‘पण हे पंतप्रधान तुमचं म्हणणं ऐकणं सोडाच, उत्तरही देण्याची तसदी घेणार नाहीत’.
या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर देताना म्हटलं होतं की, ‘तुम्हाला राजीव गांधींबद्दल बोलायचं आहे बोला…माझ्यावरही बोला…मनसोक्त बोला, पण जनतेला हे देखील सांगा की राफेलमध्ये काय झालं आणि काय नाही झालं. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचं काय झालं त्याबद्दलही सांगा’.