असाही बाप …दहावीच्या परीक्षेत परीक्षेत ‘ए प्लस’ न मिळाल्याने मुलाच्या पायावर मारली कुदळ !!

केरळमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेत ‘ए प्लस’ न मिळाल्याने एका वडिलांनी मुलाला कुदळीने मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा पाय तूटला आहे. याप्रकरणी आरोपी पित्याला पोलिसांनीअटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील किलिमनूर येथे मंगळवारी परिक्षेत सर्व विषयात ‘ए प्लस’ न मिळवल्याने वडिलांनी मुलाला मारहाण केली. कुदळीने केलेल्या मारहाणीत मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्याचा पाय तूटला आहे. केरळमध्ये सोमवारी SSLC बोर्डाचे म्हणजेच दहावीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये सर्व विषयात ‘ए-प्लस’ न मिळवल्याने वडील संतापले आणि त्यांनी मुलाला मारहाण केली.
साबुच्या पत्नीने याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी साबू विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. घटनेनंतर साबू फरार झाला होता. पोलिसांनी फरार साबूला मंगळवारी अटक केली. साबुला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.