राजीव गांधी यांच्याबाबदल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पंतप्रधान नरेंद मोदी माझ्या मनातून उतरले : प्रियदर्शन जाधव

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी राजीव गांधी यांच्या अनुषंगाने काढलेले अनुद्गारामुळे अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे . त्यात सिने अभिनेता प्रियदर्शन जाधव यांनीही आपली नाराजी व्यक्त करणारे ट्विट करून म्हटले आहे कि , “राजीव गांधी यांच्याबाबदल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे पंतप्रधान नरेंद मोदी माझ्या मनातून उतरले आहेत” पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान व राहुल गांधींचे वडील राजीव गांधींबद्दल एक विधान केलं होतं ज्यावरून बरेच वाद झाले होते.
या ट्विट मध्ये प्रियदर्शनने म्हटले आहे कि , “राजीव गांधी ह्यांच्या विधानाने तर पूर्णपणे तुम्ही पूर्णपणे मनातून उतरलात मोदीजी! सामान्य माणसाला काहीच कळत नाही, अशा भ्रमात राहू नका. ही तीच माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली आणि काँग्रेसला घरी बसवलं,” असं त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय “बाकी तुम्हाला सांगायची गरज नाही” असा टोलाही प्रियदर्शनने लगावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि अप्रत्यक्षपणे राजीव गांधी भ्रष्टाचारी असल्याचे दाखला देत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. “तुमच्या वडिलांना ‘राजदरबाऱ्यांनी’ मिस्टर क्लीन बनवलं होतं. मात्र बघता बघता भ्रष्टाचारी नंबर १ म्हणून त्यांचा अंत झाला. जो अहंकार तुम्ही बाळगत आहात, त्यातच तुमचाही अंत होईस. हा देश चुका माफ करतो. मात्र विश्वासघात करणाऱ्याला कधीच क्षमा करणार नाही’, असं नरेंद्र मोदी म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर म्हणून राहुल गांधींनी सुद्धा त्यांना अतिशय प्रेमळ शब्दांत सुनावले होते.