मोदी सरकार नाही , गजनी सरकार !! . मोदीजी गाय पे चर्चा करता, जरा महागाईवर पण बोला : उद्धव ठाकरे यांनी सुनावले…

मुंबई : लोकसभा निवडणूक तिसऱ्या टप्प्यात आलेली असताना विरोधक मोदींवर अत्यंत कडक शब्दात टीका करताना दिसत आहेत. मोदींनी महाराष्ट्राशी द्रोह केला, गद्दारी केली. मोदी सरकार बदलत आहे, हे आता जगभर झाले आहे. हे मोदी सरकार नाही गजनी सरकार आहे. काल काय बोलले, ते आज आठवत नाही, काय आश्वासन दिली ते कळत नाही. फुटबॉल सामन्यात होते तसे मोदी दररोज सेल्फ गोल मारतात. मोदीजी गाय पे चर्चा करता, जरा महागाईवर पण बोला, या शब्दांत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.
शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात गांधी मैदानात शिवशाहू निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी संबोधित करताना भाजपसह मोदी शाहांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की, काही प्रश्न विचारतात की शिवसेनेची मत काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? होणार की नाही? कारण काँग्रेसच्या हातामध्ये मशाल आहे, काँग्रेसच्या हातात मशाल घेऊन चार जूनला आपल्याला विजयाची तुतारी फुंकायची आहे. जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी मी आलो आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील, त्यांची निशाणी हात आहे, तुतारी घेतलेला मावळा आहे आणि मशाल आहे याच उमेदवारांना लोकसभेत पाठवा आणि हुकूमशहांचे सरकार गाडून टाका, असे आवाहन त्यांनी केले.
Shivsena Live महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार छत्रपती शाहु महाराज ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची प्रचारसभा. https://t.co/yg89TkDnGv
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 1, 2024
सुरतचे लुटारू महाराष्ट्र लुटत आहेत…
महाराष्ट्राची परंपरा शुरा मी वंदितो अशी आहे तर भाजपची परंपरा चोरा मी वंदिले अशी आहे. . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हे मानायला तयार नाही. मोदीजी गुजरातमध्ये तुमचा भटकता आत्मा शोधा, महाराष्ट्रात शोधू नका. आमच्या मशालीला हात घालू नका नाही, तर भस्मसात व्हाल, असा थेट इशारा देताना, कोरोना काळात सांगत होतो की, त्या व्हायरसपासून दूर रहा. आज सांगतो की, भाजपाच्या यरसपासून दूर रहा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, सुरतचे दोघे महाराष्ट्र लुटत आहेत. पण या लुटारुंचा सुफडासाफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवला.
तुम्हाला राजकारणात मूलं होतं नाहीत त्यात आमचा काय दोष
ठाकरे म्हणाले की, अटलजी पवार साहेबांचे कौतुक करत होते. गुजरातमध्ये भूकंप आला होता तेव्हा पवार साहेब धावून गेले आणि गुजरातला मदत केली होती. अटलजी पंतप्रधान असताना त्या आपत्ती व्यवस्थापनाचा अध्यक्षपद पवार साहेबांकडे होते. आणि आता हे जे बोलताहेत यावरून हेच वखवखता आत्मा आहे. कोणी तरी शिवाजी महाराजांशी तुलना केली, अशी तुलना मोदींवरून होऊ शकत नाही. मोदींची तुलना महाराजांसोबत होऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या दैवताच्या वाटेला जाऊ नका, नाही तर महाराष्ट्र सहन करणार नाही. जो महाराष्ट्राच्या मुळावरती आलेला आहे त्याचा सुपडासाफ आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला राजकारणामध्ये मुलं होत नाहीत म्हणून आमच्यातले गद्दार चोरून तुम्हाला उभे करावे लागतात, आमची काही पोरं तुम्ही चोरले, कोणी काही गद्दार चोरले. पवार साहेबांचे सुद्धा चोरले. पण महाराष्ट्रातील करोडो लोक सोबत उभे राहिले असल्याचे ते म्हणाले.