नागपूरात भाजपतर्फे आयोजित शिबीरात, चेंगराचेंगरीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

नागपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरात भाजपतर्फे बांधकाम कामगारांसाठी आयोजित शिबीरात किचन किट वाटप केले जात असतांना रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात महिलांची प्रचंड गर्दी झाली. दरम्यान, नियोजन बिघडल्याने चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर काही ८ ते १० महिला जखमी झाल्या आहेत.

Advertisements

ही घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात घडली. मनूबाई तुळशीराम राजपूत (६५, आशीर्वादनगर) असे मृतक महिलेचे नाव आहे. भाजपतर्फे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत नोंदणीकृत कामगारांसाठी स्वयंपाकघर व इतर आवश्यक सामानाच्या वितरणासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

8 मार्च ते 11 मार्च दरम्यान कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या सुमारे एक लाख कामगारांच्या कुटुंबाना किचन सेट दिले जाणार आहेत. यात महिलांना गृहोपयोगी वस्तू संचाचेदेखील वितरण होणार होते. सकाळी १० वाजल्यापासून शिबीराची वेळ होती. मात्र सकाळी सात वाजल्यापासूनच सुरेश भट सभागृहासमोर लाभार्थ्यांची गर्दी जमली होती.  हजारो लोक बाहेर उभे होते.

सकाळी सव्वा दहा वाजेनंतर सभागृहाचे दार उघडले असता आत जाण्यासाठी सर्वांनी धाव घेतली. त्यात गर्दी झाली व काही महिला खाली पडल्या. चेंगराचेंगरीदरम्यान मनुबाईंच्या अंगावरून अनेक जण गेले.

त्यांच्यासह इतर महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीने मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मनुबाईंना मृत घोषित केले. काही जखमी महिलांचा उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!