पालघरमध्ये माथेफिरू व्यक्तीने केली दोन भावांची निर्घृण हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

Palghar: पालघरच्या कुडणमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमराव पाटील (72) आणि मुकुंद पाटील (80) या दोघांची कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपी तेथून फरार झाला होता. घटनेची माहिती मिळताच तारापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात फरार झालेल्या आरोपीस पकडण्यास पालघर पोलिसांना यश आले आहे.

Advertisements

पालघरमधील तारापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या कुडण येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन भावांची हत्या करून आरोपी कुरण खाडीमधील पाण्यात लपून बसला होता.

Advertisements
Advertisements

नेमकं काय घडलं?

कुडण येथे राहणाऱ्या भिवराव आणि मुकुंद पाटील यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालत माथेफेरूने बाजूला राहणाऱ्या घरावर देखील हल्ला केला होता. त्यावेळी रुपेश पाटील व त्याचे वडील या दोघांनी पुढचे दार बंद केले आणि ते मागच्या दाराने बाहेर आले. तसेच बेसावध असणाऱ्या या मारेकऱ्याच्या हातातील कुदळ हातातून खेचून घेतली.

त्यानंतर त्यांनी गावाबाहेर असणाऱ्या मोकळ्या जागेत पलायन केले. गावातील नागरिकांनी त्याला कुरण खाडीच्या दिशेने जाताना पाहिले होते. तो येथेच लपून बसला असावा असा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी खाडीमध्ये उतरून त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी व नागरिकांनी रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याला पकडले. हल्ला करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास पालघर पोलीस करत आहेत.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!