माजी खासदार आणि सिनेस्टार जयाप्रदा यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश

Advertisements
Advertisements
Spread the love

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कोर्टात हजर न राहिल्याबद्दल कोर्टाने माजी खासदार आणि सिनेस्टार जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने पोलिसांना जयाप्रदा यांना अटक करून हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisements

या प्रकरणी सुनावणीची 27 फेब्रुवारी तारीख निश्चित करण्यात आली आहे. पोलिस अजामीनपात्र वॉरंट घेऊन जया यांचा शोध घेत आहेत. याआधीही जयाप्रदा यांना शोधात पोलीस दिल्लीत पोहोचले होते.

Advertisements
Advertisements

माजी खासदार जयाप्रदा यांनी 2019 मध्ये रामपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्याच्यावर स्वार आणि केमरी पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणांची सुनावणी विशेष न्यायाधीश खासदार-आमदार दंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे.

या प्रकरणात, दिलेल्या तारखांना हजर न राहिल्यामुळे जयाप्रदा यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. जयाप्रदा यांच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. मात्र, जयाप्रदा पुन्हा एकदा न्यायालयात हजर झाल्या नाहीत.

एडीजीसी संदीप सक्सेना यांनी सांगितले की, जयाप्रदा यांच्या कोर्टात सतत गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आत त्यांना अटक करण्यास सांगितले असून पुढील सुनावणी ही २७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

जयाप्रदा यांना अटक करण्यासाठी एसपींनी एक विशेष टीम तयार केल्याचे वृत्त आहे. टीमने जयाप्रदा यांच्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद येथील कार्यालयांवर छापे टाकले. दरम्यान, या दोन्ही छाप्यांमध्ये पोलिसांना जयाप्रदा सापडली नाही.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!