धक्कादायक, १७ वर्षांच्या मुलीवर केला 26 वेळा सामूहिक बलात्कार
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १७ वर्षांच्या मुलीला तिच्या प्रियकराने वाढदिवसानिमित्त बोलावून त्याच्या मित्रांसोबत बलात्कार केला आहे. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी आलेल्या 12 छायाचित्रकारांनी पुढील दोन दिवसांत तिच्यावर 26 वेळा सामूहिक बलात्कार केला. हि माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली असून आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे.
ही घटना विशाखापट्टणममधील आरबी बीचवर घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी 18 डिसेंबर रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. ही मुलगी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी मोलकरीण असल्याचे सांगण्यात आले आहे. ते काही दिवस सुट्टीसाठी बाहेरगावी गेले असल्याने त्यांची मुलगी त्यांच्या घरी एकटीच राहून पाळीव प्राण्यांची काळजी घेत होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आणि तीन दिवसांनी तिचा शोध लागला.
दंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवला
आता मेडिकल झाल्यानंतर मुलीचे लेखी म्हणणे दंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले आहे. या निवेदनाच्या आधारे पोलिसांनी मुलीच्या प्रियकरासह एकूण १३ आरोपींविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर रोजी दाखल झालेल्या या गुन्ह्यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अन्य दोन आरोपींच्या शोधात त्यांच्या सर्व संभाव्य ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले की, १७ डिसेंबरला तिचा वाढदिवस होता.
यावेळी तिला गिफ्ट देण्यासाठी तिच्या प्रियकराने तिला आरके बीचवर बोलावले. आरोपी प्रियकराचा मित्रही तिथे होता. दोघांनी तिला जवळच्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला या घटनेचा धक्का बसला आणि ती आत्महत्या करण्याच्या विचाराने समुद्रकिनाऱ्यावर गेली, पण तिच्या मदतीसाठी आलेल्या 11 फोटोग्राफर्सनी तिचा जीव वाचवला, मात्र तिला एका लॉजमध्ये दोन दिवस कैद ठेवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
तिने आरोपींच्या तावडीतून सुटका करून, कशीतरी ओडिशातील कालाहांडी येथे पोहोचली. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
अर्जुन पुरस्कार विजेते डीएसपी दलबीर सिंह यांची गोळ्या झाडून हत्या
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765