Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा होरपळून मृत्यू, अपघात की घातपात ?

Advertisements
Advertisements
Spread the love

बीड अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूरजवळ लातूर अंबाजोगाई रोडवर एक कार जळून खाक झाली आहे. या कारला अचानक आग लागल्यामुळे गोंधळ उडाला. या घटनेत चालकाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा आगीत जळून मृत्यू झाला असून, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

Advertisements

दुर्घटनाग्रस्त कार 20 डिसेंबर रोजी संध्याकाळच्या वेळी अंबाजोगाईहून लातूरकडे जात होती. एका पेट्रोल पंपावर ही कार येऊन थांबली. बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ कार येताच या कारने अचानक पेट घेतला व काही क्षणांत कार जळून खाक झाली आहे. कारमध्ये होरपळलेल्या या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. ही व्यक्ती स्त्री आहे की पुरुष? याचा देखील तपास पोलीस करत आहेत. आतापर्यंतच्या पोलीस तपासात ही कार लातूर येथील एका व्यक्तीची असल्याचे समोर आले असून, त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Advertisements
Advertisements

पेट्रोल पंपाजवळ येताच कारला भीषण आग

बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कार अंबाजोगाईहून लातूरकडे निघाली होती. दरम्यान, बर्दापूरजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ येताच कारला भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात कार अक्षरशः पूर्णपणे जळून खाक झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीत चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवर एक व्यक्ती जळून खाक झालेल्या अवस्थेत दिसली. या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवला असून, पुढील तपास सुरु आहे.

या घटनेच्या निमित्ताने अनेक प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कारमधील चालकाच्या बाजूला असलेल्या सीटवरील व्यक्तीचा जळून मृत्यू झाला, मात्र या वेळी कारचालक किंवा कारमालक कोणीही घटनास्थळी आढळून आले नाही. त्यामुळे हा अपघात आहे की, घातपात यादृष्टीने देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांनी संबंधित कारची माहिती काढली असून, कारमालक सापडल्यानंतरच या सर्व गोष्टींचा खुलासा होऊ शकणार आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!