‘आयसिस’ चा दहशतवादी अबू बकर अल-बगदादीचा चेहरा पाच वर्षानंतर पुन्हा जगापुढे !!

ISIL chief Abu Bakr al-Baghdadi makes video appearance after a gap of 5 years
Read @ANI story | https://t.co/fn2GLFTuww pic.twitter.com/9Nk8b9dSwA
— ANI Digital (@ani_digital) April 29, 2019
जगभरात दहशत माजवणाऱ्या ‘आयसिस’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी ठार झाल्याच्या बातम्या अनेकदा झळकल्या असताना तब्बल पाच वर्षांनंतर एका व्हिडिओतून बगदादी पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. ‘आयसिस’ने जारी केलेला बगदादीचा हा व्हिडिओ नेमका कधी चित्रीत करण्यात आला आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बगदादी २०१४ मध्ये मोसुल शहरात शेवटचा दिसला होता. त्यानंतर मधल्या काळात तो मारला गेला, तो जखमी आहे, अशी अनेक वृत्ते झळकली. त्यामुळे बगदादीचे नेमके काय झाले?, हा प्रश्न अनुत्तरीत असताना बगदादीचा ताजा व्हिडिओ पुढे आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
‘आयसिस’ने हा व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ कधी चित्रीत करण्यात आला आहे, याची तारीख देण्यात आलेली नाही. सीरियातील ‘आयसिस’चा शेवटचा गड बागूजबाबत बगदादी बोलताना दिसत आहे. ‘बागूजची लढाई संपुष्टात आली आहे’, असे बगदादी अन्य तिघांना सांगत आहे. या तिघांचे चेहरे ब्लर करण्यात आलेले आहेत.