संजय राऊत यांच्या निकटवर्तीयास ईडीकडून अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुंबई महापालिका कोविड घोटाळा प्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे.

कोविड काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठे कोविड सेंटर उभारण्यात आले होते, यावेळी अनेक लोकांना पात्रता नसताना कामे देण्यात आली होती, नियम डावलून त्यांना कामे देण्यात आली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

कोविद काळात जेवढे कॉन्ट्रक्ट ज्या कंपन्यांना देण्यात आली आहेत. त्या कंपन्या काही दिवसापूर्वी सुरू केल्या आहेत. त्या कंपन्यांना अनुभव नाही, यात अनेक नियम डावलले आहे.

Advertisements

ज्या डॉक्टरांच्या नावे बिलं काढण्यात आली ते डॉक्टरही त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे, या प्रकरणी आता ईडीने कारवाई केला आहे.

Advertisements
Advertisements

ईडीचे आरोप काय आहेत ?

जम्बो कोविड हॉस्पीटल सुरू करण्यासाठी काही खासगी कंपन्यांना कंत्राट दिले होते. या कंपनीने जे डॉक्टर आणि संबधीत यंणत्रा दाखवली ती यंत्रणाच अस्तित्वात नव्हती असा आरोप करण्यात आला आहे.

या कारवाईत सुजीत पाटकर हे लाईफ लाईन मॅनेजमेंटचे संचालक होते तर दुसरे बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे इंचार्ज डॉ. किशोर बिचुले यांना आधीच ईडीने अटक केली आहे.

या अटकेने खासदार संजय राऊत यांना आता मोठा धक्का मानला जात आहे. या प्रकरणी आता आणखी काही अधिकारी ईडीच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

 

MaharshtraRainUpdate : मुंबई , कोकण , मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी , औरंगाबाद शहरातही पावसाला प्रारंभ …

संजय राऊत

 

Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!