AccidentNewsNUpdate : भरधाव कार उलटली , वडिलांसाठी औषध घेऊन येणारा मुलगा आणि त्याचा मित्र ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

सोलापूर :हुबळी येथून आजारी वडिलांसाठी औषध घेऊन घराकडे परत येताना भरधाव कार उलटून मुलासह त्याच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात इतर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि,दत्ता पोपट घोलप (३४ रा. राऊत नगर, अकलूज) व श्याम उमाकांत गायकवाड (३३ रा. मटन मार्केट, अकलूज ता. माळशिरस) अशी मृतांची नावे असून काल मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला तालुक्यात महूद- दिघंची रोडवर कटफळ फॉरेस्ट जवळ हा अपघात घडला.

Advertisements

या अपघातात महावीर बाळासाहेब भोसले (३२) व बबलू पंडित चुनाडे (दोघेही रा.अकलूज) हे दोघे जखमी झाले असून याबाबत विकी दिलीप घोलप (रा. राऊत नगर, अकलूज) यांनी पोलिसात खबर दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार दत्ता घोलप हा आजारी वडिलांसाठी औषध आणण्यासाठी मित्र श्याम गायकवाड, महावीर भोसले व बबलू चुनाडे असे चौघेजण मिळून अकलूज येथून २८ जून रोजी स्वत:च्या कार(एम.एच. ४५ / ए. एल. १२०८) मधून हुबळी जिल्ह्यात धारवाड (कर्नाटक) येथे गेले होते. औषध घेतल्यानंतर २९ जून रोजी चौघेजण आदमापूर येथे गेले. त्याठिकाणी संत बाळूमामाचे देवदर्शन घेऊन पुढे सायंकाळी अकलूजकडे निघाले. त्यांची कार शुक्रवार, ३० जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास दिघंचीहून – महूद रोडने निघालेली असताना सांगोला तालुक्यात कटफळ शिवारात फॉरेस्ट जवळ चालकाचा कारवरील ताबा सुटला. अपघातात कार रस्त्याच्या कडेला तीन-चार वेळा उलटली. अपघातात दत्ता घोलप व श्याम गायकवाड या दोघांच्या डोकीस गंभीर मार लागून जागीच मरण पावले तर दोघेजण जखमी झाले.

Advertisements
Advertisements

या अपघाताची माहिती एका अनोखळी व्यक्तींनी जखमी बबलू चुनाडे यांच्या घरी दिली दरम्यान जखमींना तातडीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी पुढील उपचाराकरता अकलूज येथे खाजगी रुग्णालयात हलवले. तसेच दत्ता घोलप व श्याम गायकवाड यांचे सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!