News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. नागपूर – माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांची फसवणूक, ७० लाखांचा गंडा, नंदनवन ठाण्यात गुन्हा दाखल
2. काँग्रेसचे उमेदवार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आज दुपारी ११ वाजता पाटणा साहिबमधून उमेदवारी अर्ज भरणार
3. अकोल्यात अती उष्णतेची लाट; तापमान ४७ अंशांवर
4. दिंडोरी (नाशिक)-तालुक्यातील शिंदवड येथील प्रकाश निवृत्ती बस्ते या शेतकऱ्याने द्राक्षबागेतील फवारणीचे औषध पिऊन आत्महत्या
5. अभिनेता आणि भाजपचा उमेदवार सनी देओल आज गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार
6. औरंगाबादः अनैतिक संबंधातून तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांकडून आरोपी राजेंद्र उर्फ काभू उर्फ कारभारी कान्होजी मगरे व प्रशांत भानूदास साळवे यांना अटक; दोघांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी
7. मध्य प्रदेशः प्रचारसभेला जाताना मोदी हेलिकॉप्टरचा वापर करतात; एवढे पैसे आणतात कुठूनः मुख्यमंत्री कमलनाथ यांची विचारणा
8. उत्तर प्रदेशः लखीमपूर येथे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा रोड शो
9. अहमदनगर : अकोले तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे या शेतकऱ्याची सावकाराच्या कर्जाला व जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10. मी कन्हैय्या कुमारचा समर्थकः माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचं वक्तव्य
11. आसाम : गुवाहाटी जीआरपीने आज गुवाहाटी रेलवे स्टेशनवर कामरूप एक्सप्रेसमधील एका प्रवाशाकडून १.३०० किलोग्रॅम वजनाची सोन्याची ८ बिस्किटे जप्त
12. औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने २९ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलली; राज्यातील विविध मतदार संघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असल्याने घेतला निर्णय
13. मालाड येथे आक्सा बीचवर बुडणाऱ्या दोघांना जीवरक्षकांनी वाचविले
14. रात्री तीनच्या सुमारास पैठण रोडवरील औरंगाबाद येथे व्हिडिओकॉन कंपनीत लागली आग; अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात
15. औरंगाबाद शहरात बीड बायपास रोडवरील एका मंगल कार्यालयाला रविवारी पहाटे आग; कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान