मोदी म्हणतात , मला जातीवरून विरोधक ‘ नीच ‘ म्हणतात तर विरोधक म्हणतात , मोदी “कुरापती” आहेत , त्यांची जात कुणीही काढली नाही !!

कन्नौजच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक आपली जात काढत असून मी मागास जातीतील असल्याने मला ‘ नीच ‘ असे संबोधून टार्गेट बनविण्यात येत असल्याचे म्हटले होते त्यावरून उत्तर भारतात जातीय राजकारण तापत असून या वादात आता अरुण जेटलीही उतरले असून पंतप्रधान मोदींच्या औचित्य काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे . वास्तविक या वादावर बोलताना बसप नेत्या मायावती यांनी कालच खुलासा केला आहे कि, नरेंद्र मोदी यांना कुणीही ते ‘नीच’ जातीचे आहेत असे म्हटले नाही, परंतु मोदी स्वतःच कुरापती आहेत. त्यांनी स्वतःच जातीचे भांडवल करून विरोधकांवर कुभांड रचले आहे.या उलट मोदी स्वतः उच्चवर्णीय असल्याने कुणीही त्यांना ‘नीच’ म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
कारण काहीही असो , लोकसभा निवडणुकीत पुन्हा जातीचा मुद्दा तापला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची जात खोटी आहे, असं म्हणत विरोधी पक्षांनी हल्लाबोल केलाय. तर जातीचं राजकारण करून मालमत्ता कमावणाऱ्यांना जनताच उत्तर देईल, असं प्रत्युत्तर भाजपने विरोधकांना दिलंय.
आपण मागास जातीचे असल्याचं पतंप्रधान मोदी सांगतात. पण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या जातीचा ओबीसीमध्ये समावेश केला होता, असा आरोप बसपा अध्यक्ष मायावतींनी केला होता . . तर मोदी हे कागदावरचे ओबीसी आहेत, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीवरून होत असलेल्या विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी उत्तर दिलं. पंतप्रधान मोदींच्या जातीचा मुद्दा करण्याचं औचित्य काय? त्यांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही. मोदींनी फक्त विकासाचं राजकारण केलं. ते राष्ट्रवादी आहेत, असं ट्विट अरुण जेटलींनी केलंय. जातीचा मुद्दा करत विरोधकांनी आतापर्यंत जनतेची फसवणूक केलीय. गरीबांना जातीच्या नावाने फसवणाऱ्यांना कधीच यश मिळणार नाही. जातीच्या नावाने त्यांनी फक्त पैसा कमावला आहे. बसपा आणि राजदच्या नेतृत्वाकडे असलेल्या संपत्तीच्या तुलनेत मोदींकडे असलेली संपत्ती ०.०१ टक्केही नाही, असं जेटली म्हणाले.
पंतप्रधान मोदी जातीयवादी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी कन्नौजमधील प्रचारसभेत केला. पंतप्रधान मोदी कुठल्या जातीचे आहेत हे मला माहित नाही. पण विरोधकांनी यासंबंधी कधी चर्चा केली नाही. काँग्रेसने फक्त विकासाचा मुद्दा मांडला आहे. आम्ही मोदींवर कुठलीही वैयक्तीक टीका केली नाही, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.