….आणि प्रज्ञासिंह ठाकूर यांनी लोकसभेचे मैदान सोडले !!

तुम्हाला काय वाटले ? भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि बहुचर्चित भोपाळ लोकसभा मतदारसंघातून प्रज्ञासिंह ठाकूरने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पण या प्रज्ञासिंह म्हणजे भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरनाहीत, तर भोपाळमधून निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
त्याचे असे झाले कि , भोपाळमध्ये प्रज्ञासिंह ठाकूर नावाचे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने उमेदवारी दिली आहे, तर दुसऱ्या प्रज्ञासिंहने अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. नाम साधर्म्यामुळे मतदार अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याची भाजपला भीती होती. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंहने अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंहला घरी बोलावले. तिच्याशी चर्चा केली आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. या प्रज्ञासिंहला साध्वी प्रज्ञासिंहने भगवी शालही भेट दिली. त्यानंतर अपक्ष उमेदवार प्रज्ञासिंहने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. अपक्ष उमेदवाराच्या या घोषणामुळे साध्वी प्रज्ञासिंह आणि भाजपने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.