धक्कादायक : बसमध्ये पत्नीची हत्या करून पती मृतदेहाजवळ बसून राहिला…

गुजरात, सूरतमध्ये एका शिपायाने कंडक्टर पत्नीची धारदार शस्त्राने बसमध्ये हत्या केली आहे. त्याने धारदार शस्त्राने पत्नीचा गळा कापल्यानंतर पत्नीवर त्याच शस्त्राने सपासप वार केले. त्यामुळे बसमधील घाबरलेले प्रवासी बसमधून उतरले आणि घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्याने हत्या केल्याचे पतीने पोलिसांना सांगितले.
गुजरात, सूरतमध्ये तैनात असलेला शिपाई अमृत रथवाने पत्नी मंगुबेनची हत्या केली आहे. मंगुबेनचे अवैध संबंध असल्याचा संशय अमृतला होता. याच संशयातून अमृतने मंगुबेनच्या हत्येचा कट रचला असल्याचे वृत्त आहे. अमृत रथवाची पत्नी मंगुबेन छोटा उदयपूरमध्ये गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होती. पती, पत्नी २१ डिसेंबरला एकाचवेळी ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाले. पत्नीची बस भिखापूर गावाजवळ पोहोचल्यावर पती धारदार शस्त्र घेऊन बसमध्ये चढला. त्याने बसमध्येच पत्नीचा गळा कापला. हा प्रकार पाहून बसमधील प्रवासी घाबरले. सगळे प्रवासी बसमधून उतरले.
पत्नीचा गळा कापल्यानंतरही पतीचा राग शांत झाला नाही. त्याने तिच्यावर अनेक वार केले. बसमध्ये रक्ताचा सडा पडला होता. हत्या केल्यानंतर पती फरार न होता पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी आरोपीला अटक केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
MumbaiNewsUpdate : व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055