मोदींना येणे आहे, देणे कोणाचेही नाही !! शपथपत्रात पत्नीचा फक्त नामोल्लेख

पंतप्रधानांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नी म्हणून जशोदा बेन यांचा उल्लेख करण्यात आलाय. मात्र इतर कुठलीही माहिती त्यात देण्यात आली नाही. गांधीनगरमध्ये एका घरात त्यांचा हिस्सा असून त्याची किंमत 1 कोटी 10 लाख एवढी आहे. त्यांच्यावर कुठलंही कर्ज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीत आपला उमेदवारी अर्ज दाखल दाखल केला. ते दुसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची पूर्ण माहिती दिलीय. गेल्या पाच वर्षात पंतप्रधानांच्या संपत्तीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याची माहिती पुढे आलीय.
2013-14 मध्ये मोदींची संपत्ती 9 लाख 69 हजार 711 एवढी होती. 2017-18 त्यात वाढ होऊन ती 19 लाख 92 हजार 520 एवढी झालीय. गेल्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत 10,22,809 लाखांची वाढ झालीय. त्यांच्याकडे 38,750 रुपए रोख असल्याचं त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कमाईत एक लाखांपेक्षा जास्त रुपयांची घट झाली. 2013-14मध्ये मोदींची कमाई 9.69 लाख एवढी होती. दुसऱ्या वर्षी म्हणजे 2014-15 मध्ये त्यांची कमाई 8.58 लाख असल्याचं दाखविण्यात आलंय. म्हणजेच त्यांच्या कमाईत 1.10 लाखांची घट झाली. मात्र 2015-16 मध्ये त्यांच्या कमाईत घसघशीत वाढ झालीय. त्यांचं वार्षिक उत्पन्न 19,23,160 लाख रुपए एवढं होतं. त्यानंतर 2016-17 मध्ये पुन्हा त्यांची कमाईत घट होऊन ती 14,59,750 लाख एवढी झाली. तर 2017-18 मध्ये त्यांच्या संपत्तीत वाढ होऊन ती 19 लाख 92 हजार 520 एवढी झालीय.
मीदींची एकूण संपत्ती 2 कोटी 51 लाख 36,119 रुपये एवढी आहे. त्यात 1 कोटी 41 लाख 36,119 कोटींची स्थावर तर 1 कोटी 10 लाखांची जंगम मालमत्ता आहे. पंतप्रधानांच्या बँक खात्यात फक्त 4 हजार 143 रुपये आहेत. त्याच बरोबर स्टेट बँक ऑफ इंडियात त्यांची एफडी असून त्याची रक्कम वाढून आता 1 कोटी 27 लाख एवढी झालीय. त्यांनी 20 हजार रुपये सरकारी बाँड तर 7.61 लाख रुपये NSC मध्ये गुंतवले आहेत. पंतप्रधानांजवळ 1 लाख 13 हजारांच्या सोन्याच्या चार अंगढ्या आहेत.
इन्कम टॅक्स कडून TDS मध्ये कपात झालेले 85 हजार 145 रुपये आणि पंतप्रधान कार्यालयाकडून 1 लाख 40 हजार रुपये त्यांना मिळणे बाकी आहे.