देश सत्तेच्या बाजूने उभा आहे , सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नव्हे : नरेंद्र मोदी

देशात सत्ताविरोधी नव्हे, तर सत्तेच्या बाजूनं वातावरण आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले . वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरण्याआधी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला . यावेळी ते म्हणाले कि , काशीमध्ये आजही मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जातायत. जनतेच्या आमच्याकडून आशा-अपेक्षा आहेत. लोकांना पुन्हा मोदी सरकार हवं आहे. पोलिंग बूथ जिंकायचं आहे. एकाही पोलिंग बूथवर भाजपाचा झेंडा खाली येणार नाही, याची कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. मीसुद्धा बूथ कार्यकर्ता राहिलो आहे.
पुरुषांच्या तुलनेत महिलांनी मतदान 5 टक्के जास्त करावं. मोदी सर्वाधिक मतांनी जिंकू दे अथवा नको, हा रेकॉर्डचा मुद्दा नाही. मी पंतप्रधान असल्यानंच निवडून आल्यास त्यात काय नवल आहे. त्यात मला काहीच रुची नाही. माझा लोकशाही जिंकवण्यावर विश्वास आहे. कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार आहे, कृपाकरून याची चर्चा करत बसू नका. प्रत्येक उमेदवार हा सामान्य आहे. तोसुद्धा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी मैदानात उतरला आहे. ते आमचे शत्रू नाहीत, असंही मोदी म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, शुक्रवारी एनडीएतील घटकपक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या साक्षीनं; तसंच शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाश सिंग बादल यांचे आशीर्वाद घेऊन वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला.
मी वाराणसीतील नागरिकांचे मनापासून आभार मानतो. ५ वर्षांनंतर येथील नागरिकांनी पुन्हा आशीर्वाद दिला आहे. जिथे-जिथे मतदान अजून व्हायचं आहे, तिथं शांततेत मतदान करावं अशी मतदारांना विनंती करतो, असं मोदी म्हणाले.