प. बंगाल: मुर्शीदाबादमधील मतदान केंद्राजवळ गावठी बॉम्बचा स्फोट; ३ जखमी तर दुसऱ्या घटनेत एका मतदाराचा मृत्यू

मुर्शीदाबादमधील राणीनगर मतदान केंद्राजवळ अनोळखी व्यक्तींनी आज गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. या स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केलं. सातमध्ये अनोळखी व्यक्तींनी गावठी बॉम्ब फेकला. यात तृणमूल काँग्रेसचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना मुर्शीदाबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या स्फोटानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान केंद्र बंद केलं. दरम्यान, मालदा दक्षिण मतदारसंघातील कालिया चौक परिसरातील मतदान केंद्राबाहेरही दुचाकीवरून आलेल्या अनोळखी व्यक्तींनी गावठी बॉम्ब फेकल्याची घटना घडली. काँग्रेस-तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; मतदाराचा मृत्यू
मुर्शीदाबादमधील बलिग्राममधील मतदान केंद्राबाहेर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यात मतदानासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका मतदाराचा मृत्यू झाला आहे.