SupremeCourtNewsUpdate : शिवसेनेच्या सुनावणीला प्रारंभ , आजपासून सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग ….

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आता सर्वसामान्यांनाही सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पाहता येणार आहे. आजपासून घटनात्मक विषयांचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. SC ने घटनापीठासमोरील खटल्यांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था केली आहे. दरम्यान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या याचिकेवरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे.
या प्रकरणांमध्ये EWS आरक्षण, महाराष्ट्र शिवसेना वाद, दिल्ली-केंद्र वाद यांचा समावेश आहे. खरे तर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीचे लाइव्ह स्ट्रिमिंग करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यातच घेण्यात आला होता. घटनापीठाच्या खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या घटनात्मक बाबींचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. CJI U U ललित यांच्या अध्यक्षतेखालील पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान 26 सप्टेंबर 2018 रोजी कायद्याच्या विद्यार्थ्याने याबाबत दाखल केलेल्या याचिकेमुळे आता सर्वोच्च न्यायालयाने घटनात्मक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांच्या न्यायालयीन कामकाजाच्या थेट-प्रक्षेपणास परवानगी देत, असे म्हटले आहे की याद्वारे लोकांपर्यंत जाणारी प्रत्येक गोष्ट सूर्य प्रकाशा ईतकी स्पष्ट आणि सर्वश्रेष्ठ किटाणूनाशक ठरेल.
शिवसेनेच्या याचिकेच्या सुनावणीला सुरुवात …
महाराष्ट्रातील राजकीय संघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे, शिंदे गटाचे की ठाकरे गटाचे यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेता येईल का? या मुद्द्यावर हि सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी शिवसेना नेते अनिल देसाई आणि अनिल परब उपस्थित आहेत.
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांच्याकडून कोर्टात युक्तिवाद करताना , सिब्बल यांनी कोर्टात शिंदेच्या बंडाचा घटनाक्रम मांडला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेले लाईव्ह स्ट्रीमिंग…