News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या…

१. औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीतील मेटे कंपनीच्या लाकडी स्क्रॅपच्या गोडाउनला लागली आग, अग्निशमन दलाचे सात बंब घटनास्थळी
२. ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची न्यायालयापुढं दिलगिरी
३. काँग्रेसची लोकसभेसाठी दिल्लीतील उमेदवारांची यादी जाहीर, आपशी युती नाही.आपचे सातही उमेदवार आज अर्ज दाखल करणार
४. श्रीलंका: मृतांचा आकडा २९०वर, मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश, १३ जणांना अटक ,पुढील तपास सुरू
५. औरंगाबाद: भीषण पाणीटंचाईमुळे शहरातील बड्या हॉटेलसह तारांकित हॉटेलमधील जलतरणे तात्काळ बंद करण्याचे अपर तहसीलदारांचे आदेश
६. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ गावांचा मतदानावर बहिष्कार, मन वळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न.
७. पुणे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या काळात जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ५५० गुन्हे दाखल, तर सुमारे ४८ लाख रुपयांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
८. पुणेः कॉँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला आतून पाठिंबा, प्रकाश आंबेडकर यांचा दावा, पुण्यात कॉँग्रेसने मोहन जोशींना बळीचा बकरा बनवला.
९. लोकसभा निवडणूकः तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २३ एप्रिलला होणार मतदान. महाराष्ट्रातील १४ मतदारसंघांमध्ये होणार मतदान
१०.२३ एप्रिलला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा मुंबईत रोड शो