Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या संपर्कात , चंद्रकांत खैरे यांचा दावा …

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : शिवसेनेतून मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले पंधरा ते सोळा आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजी  वाढली असून  त्यांना असं वाटत आहे की, आपण उगीचच मातोश्री आणि उद्धव साहेबांना सोडलं…


आमदारांना या गोष्टीचं वाईट वाटत असावं आणि त्यातूनच हा प्रकार घडत आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, की गेलेल्या सर्व पन्नास आमदारांना मंत्रिपद मिळणं शक्य नाही. त्यामुळे ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यांच्यामध्ये उद्रेकता वाढत आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार मातोश्रीच्या म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा दावा खैरे यांनी केला.

Advertisements

दरम्यान नुकतंच पोलीस आयुक्तालयाच्यावतीने गणोशोत्सवपूर्वी प्रथेप्रमाणे आयोजित समन्वय बैठकीत राजकीय नेत्यांच्या मानपमानाचे नाट्य पाहायला मिळाले होते. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा अगोदर सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट चिडले होते. यावरही खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस आयुक्तांनी प्रोटोकॉलनुसारच माझा सत्कार आधी केला, असं खैरे म्हणाले.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!