VinayakMeteAccidentNews : अपघात झाल्यानंतर तासभर मदत मिळाली नाही , मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश …

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणाचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघाती निधन झाले. यावर मराठा ठोक क्रांती मोर्चाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांना मदत मिळण्यास एक तास गेला, तसेच हा अपघात नेमका कसा झाला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय मोहिते, श्वान पथक अपघात स्थळी दाखल झाले आहेत. एसपीजी, आरटीओ अशी आठ पथके तपास करणार आहेत. एक्स्प्रेस हायवेवरील सीसीटीव्हींची फुटेज तपासणार आहेत. दरम्यान यात पोलिसांची दिरंगाई असल्यास कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
Maharashtra Shiv Sangram leader & former state minister Vinayak Mete injured in a car accident in Raigad early morning today passes away
CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis reach MGM Hospital in Panvel pic.twitter.com/jF3POCYrDD
— ANI (@ANI) August 14, 2022
विनायक मेटे दुसऱ्या रांगेतील सीटवर बसले होते. पोलीस सुरक्षारक्षक पुढे बसला होता. मेटेंच्या कार चालकाने थर्ड लेनमधून मध्यल्या लेनमध्ये येण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच ट्रकचालकही लेन बदलत होता. मेटेंची गाडी वेगाने असल्याचा संशय असून चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. यामुळे गाडी डाव्याबाजुने ट्रकवर आदळली. एअरबॅग उघडली, मेटे मागे झोपले होते. अचानक पुढे आदळल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघातानंतर दहा टायरचा ट्रक थांबला नाही, चालक ट्रक घेऊन पळून गेला आहे. या ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे.
रस्त्यावर झोपलो पण गाड्या थांबल्या नाही ….
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर भातान बोगद्याजवळ पहाटे पाच वाजता विनायक मेटे यांचा अपघात झाला. यानंतर सुमारे तासभर वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचा आरोप मेटेंचा चालक एकनाथ कदम यांनी केला. त्यांनी मी रस्त्यावर गाड्या थांबविण्यासाठी झोपलो पण होतो, पण गाड्या थांबल्या नाहीत. मला मुका मार लागला आहे. गार्डना थोडा मार बसला आहे. एअरबॅग होत्या म्हणून आम्ही वाचलोय, असे कदम म्हणाले. छोटा टेम्पो चालकाने मदत केली. दरेकरांच्या बॉडीगार्डला फोन केला आणि तेव्हा यंत्रणा हलल्याचे चालकाने सांगितले. त्याच्यानंतर आम्हाला रुग्णालयात आणले गेले, असे कदम यांनी सांगितले.