ShivsenaNewsUpdate : शिवसेना पुन्हा सर्वोच्च न्यायालयात , जाणून घ्या काय आहे कारण ?

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याचे कारण असे आहे , कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलीच शिवसेना खरी असल्याचा दावा करणारी याचिका निवडणूक आयोगाकडे दाखल केली असून याबाबतच्या निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोग खरी शिवसेना कोण हे ठरवू शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. शिंदे गट आणि उद्धव गटासह शिवसेनेच्या दाव्याचे कागदपत्र ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे या याचिकेत म्हटले आहे . ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली आहे.
शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणावर पुढे गेल्यास, “अपरिमित नुकसान” होईल, जे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखे आहे, जे प्रकरण न्यायालयासमोर न्यायप्रविष्ट आहे त्याची चौकशी करणे. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. यापूर्वी, निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने झपाट्याने हालचाली करीत आहेत, ते पाहता लवकरच ते शिवसेनेचे अधिकृत चिन्ह मिळवतील असे चित्र आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलेली शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी स्थापन केल्याचे पत्र एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. विशेष म्हणजे भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सत्तापालट केला. उद्धव यांची सत्तेतून हकालपट्टी करून ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.