IndiaNewsUpdate : असा असेल नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा शपथविधी सोहळा…

नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू सोमवारी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संसद भवनात विशेष तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
असा असेल शपथविधी सोहळा…
आज २५ जुलै २०२२ रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी १०.२५ वाजता द्रौपदी मुर्मू मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
द्रौपदी मुर्मू सकाळी ८.१५ च्या सुमारास दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानातून निघून प्रथम राजघाटावर जातील.
राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहल्यानंतर त्या सकाळी ९.२२ वाजता राष्ट्रपती भवनात पोहोचतील.
जर पाऊस पडला नाही तर, विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद सकाळी ९.४२ वाजता राष्ट्रपती भवनाच्या लॉनवर द्रौपदी मुर्मूचे स्वागत करतील.
सकाळी ९.५० वाजता स्वागत समारंभानंतर विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह द्रौपदी मुर्मू संसद भवनाकडे रवाना होतील. यावेळी राष्ट्रपतींचा ताफाही त्यांच्यासोबत असेल.
द्रौपदी मुर्मू आपल्या ताफ्यासह सकाळी १० वाजता संसद भवनाच्या गेट क्रमांक ५ वर पोहोचतील.
संसद भवनात पोहोचताच पंतप्रधान मोदी, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे अध्यक्ष त्यांचे सेंट्रल हॉलपर्यंत स्वागत करतील.
द्रौपदी मुर्मू संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये येताच राष्ट्रगीत वाजवले जाईल.
पदाची शपथ घेतल्यानंतर द्रौपदी मुर्मू ओथ रजिस्टरवर स्वाक्षरी करतील.