मोदी है तो मुमकिन है !! बूथ प्रमुखांसाठी ९० हजार मोदी किट !! बूथ प्रमुखाला बनवले सैनिक !! भाजपचा आक्रमक प्रचार ….

सध्या भाजप देशातील एकमेव श्रीमंत पक्ष असल्यामुळे त्यांची प्रचार यंत्रणाही त्याच तोडीची आहे . काळ बुद्ध नगर मधील नमो फूड्स ची बातमी देशभर गाजली होती . नमो फूड पॅकेट्स च्या माध्यमातून कार्यकर्त्याना नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती परंतु स्वतः डि एम आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी सांगितले होते कि , मतदान केंद्रावर आलिशान गाडीतून आणलेल्या नमो फूड पॅकेट्सचा आणि भाजपचा काहीही संबंध नाही हे पॅकेट्स ” नमो फूड्स ” नावाच्या मिठाईच्या दुकानातून आणले होते पत्रकारांनी या नावाचे दुकान गाठून थेट मालकाशी बातचीत केली तेंव्हा त्या पाकिटांचा आणि आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते शिवाय गेल्या दोन दिवसांपासून आपले दुकानाचं बंद होते त्यामुळे आम्ही हि पाकिटे देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असेहि सांगितले होते .
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ” मेरा बूथ सबसे मजबूत ” या पक्षीय कार्यक्रमांतर्गत प्रत्येक बुथवरील कार्यकर्त्यांकडे व्यक्तिशः लक्ष देऊन देश पुलवामा हल्ल्याच्या साडमुडमध्ये असताना त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बूथ प्रमुखांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण सूचना दिल्या होत्या . आपला हा बूथ प्रमुख मतदानाच्या दिवशी उठून दिसावा आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यावे या भूमिकेतून भाजपने राज्यभरातील आपल्या जवळपास ९० हजार बूथप्रमुखांसाठी मोदींच्या मुखवट्यासह टी-शर्ट, टोपीपासून ते अगदी उन्हातान्हात प्रचार करून घाम आल्यावर प्रसन्न वाटावे म्हणून बॉडी स्प्रे चीही व्यवस्था असलेले ‘मोदी-किट’ दिले आहेत.
पक्षाच्या चिन्हासह मोदी यांचे नाव आणि छबी मतदारांच्या मनावर सतत बिंबावी यासाठी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधणाऱ्या बूथप्रमुखांना हे किट देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या भागातील घराघरांतून मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारीही या बूथप्रमुखांवर आहे.
बूथप्रमुखांना देण्यात येणाऱ्या या किटमध्ये टीशर्ट, टोपी, उपरणे, हातात रबर बँड, छातीवर बिल्ला, सेंटची कुपी आदी साहित्य आहे. टोपी, उपरण्यावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ आहे. तर टीशर्ट, बिल्ला आणि बॉडी स्प्रेवरही मोदींचे चित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिवाय तोंडावर लावण्यासाठी त्यांना मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटाही देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा बूथप्रमुख हे सर्व परिधान करून प्रचाराला निघाला की कमळ आणि मोदी शिवाय मतदारांना दुसरे काहीही दिसणार नाही अशा आक्रमक प्रचाराची भाजपची योजना आहे.