AurangabadCrimeUpdate : निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले , १४ लाखांचा ऐवज लंपास

औरंगाबाद : आजारी बहिणीला भेटण्यासाठी श्रीरामपूरला गेलेल्या निवृत्त अधिकाऱ्याचे शिवाजीनगरातील घर बुधवारी (१३/०७) मध्यरात्री घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सहित कारही चोरटयांनी लंपास केली या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दोन दिवसांनी आज गुन्हा दाखल झाला.या प्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी रेकॉर्डवरच्या तिघांना संशयावरून ताब्यात घेत सोडून दिले तर गुन्हेशाखेने अल्पवयीन चोरटा चिंग्याला ताब्यात घेतले वृत्त हाती आले तेंव्हा पोलीस चिंग्याच्या घराची झडती घेत होते.
उदय मथुरादास जोशी (६४)शिवाजीनगर स्वामीसमर्थ केंद्राच्या बाजूला असे फिर्यादीचे नाव आहे. जोशी बामू विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. २०१८ साली ते सेवा निवृत्त झाले. त्यांना आरोग्यविषयक तक्रारीमुळे डॉक्टरांनी त्यांचे वाहन चालवणे बंद केले होते. त्यामुळे ते कार घरी ठेवून गावी गेले होते. २९० ग्रॅम सोने, १५३ ग्रॅम चांदी २६ हजार रु रोख व कार असा एकूण १३ लाख ९९ हजार रु चा मुद्देमाल चोरून नेला पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शेषराव खताने करत आहेत