MaharashtraPoliticalUpdate : मोठी बातमी : ठाकरे सरकारला धक्का , औरंगाबादसह तिन्हीही नामांतराला स्थगिती

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने घेतले अनेक निर्णय स्थगित करण्याचा आणि आणि त्यांच्या काळात स्थगित केलेल्या निर्णयांना पुन्हा मान्यता देण्याचा सपाटा शिंदे -फडणवीस सरकारने लावला आहे. याचाच एक भाग म्हणून महाविकास आघाडीच्या सरकारने शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या नामांतराच्या निर्णयालाही नव्या सरकारने स्थगिती दिली आहे.
ठाकरे सरकारने आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव तसेच नवी मुंबईतील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि.बा.पाटील असे नामांतर करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. २९ जून रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ठाकरे सरकारने अखेरच्या क्षणी हे निर्णय नियमबाह्य पद्धतीने घेतले असून ते स्थगिती करुन नव्याने निर्णय घेतले जाणार असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.
दरम्यान राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे पत्र दिल्यानंतर सरकारला कॅबिनेट बैठक घेता येत नाही. असे असतानाही ठाकरे सरकारने बैठक घेतली आणि काही लोकप्रिय निर्णय घेतले. यावर आक्षेप घेत ठाकरे सरकारच्या निर्णयांना हि स्थगिती देण्यात आली आहे.