WorldNewsUpdate : श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे पलायन

कोलंबो : श्रीलंकेचे वादग्रस्त राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शनिवारी राजधानीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढला. एका उच्च संरक्षण सूत्राने एएफपीला याबाबत माहिती दिली. तत्पूर्वी, दूरचित्रवाणी फुटेजमध्ये आंदोलक नेत्याच्या निवासस्थानावर घुसून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे दिसून आले. अशा स्थितीत स्वत:ला धोका असल्याचे पाहून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान “राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले,” असे सूत्राने सांगितले. संतप्त जमावाला राष्ट्रपती भवनावर वर्चस्व मिळू नये यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केला, असे ते म्हणाले.
श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठवली. सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये हा कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे ज्यात नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, नॉर्थ कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल यांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री ९ वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा कर्फ्यू लागू करण्यात आला. शुक्रवारी ही घोषणा करताना पोलिस महानिरीक्षक (IGP) सीडी विक्रमरत्ने म्हणाले, “ज्या भागात पोलिस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे त्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरातच राहावे आणि कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”
श्रीलंकेच्या बार असोसिएशनने पोलिस कर्फ्यूला विरोध केला, तो बेकायदेशीर आणि मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. “असा कर्फ्यू स्पष्टपणे बेकायदेशीर आहे आणि आपल्या देशातील लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे,” बार असोसिएशनने एका निवेदनात म्हटले आहे. श्रीलंकेच्या मानवाधिकार आयोगाने देखील पोलिस कर्फ्यूला मानवी हक्कांचे घोर उल्लंघन म्हटले होते.