BJPNewsUpdate : एकनाथ शिंदे गटाचे हिंदुत्व २४ कॅरेट सोन्यासारखे : सुधीर मुनगुंटीवार

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटाचे हिंदूत्व २४ कॅरेट सोन्यासारखे असल्याचा अभिप्राय भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. दरम्यान राज्यात सरकार स्थापनेच्या प्रस्तावाबाबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही तसेच शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हि माहिती दिली.
दरम्यान एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते असल्याचे सांगून ते म्हणाले कि , दोन-तृतियांश आमदार असणाऱ्यांना बंडखोर कसे म्हणायचे , असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या गटातल्या आमदारांना कारवाईपासून दिलासा दिल्यानंतर भाजपने पहिल्यांदाच उघडपणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपच्या आजच्या बैठकीत राज्यातल्या राजकीय परिस्थितीवर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंथन झाले. भाजपच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा झाली, त्यानुसार आमची सध्या “वेट ऍण्ड वॉच”चीच भूमिका कायम आहे. येणाऱ्या दिवसात जी परिस्थिती निर्माण होईल ती पाहून पुन्हा आमची बैठक होईल. या बैठकीत राज्यातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,’ असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.