ShivsenaNewsUpdate : आता वर्षावर माझा शिवसैनिक जाईल , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे असे फुंकले कान !!

मुंबई : एकीकडे आजारपण आणि दुसरीकडे स्वतःच्याच आमदारांनी केलेला दगा फटका यामुळे अस्वस्थ झालेले मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या पातळीवर आपल्या कट्टर शिवसैनिकांना पुन्हा एकदा बाळकडू देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आज दिवसभरात त्यांनी मंत्रालयातील कामकाज आटोपत जिल्ह्या जिल्ह्याच्या शिवसैनिकांसाठी ऑनलाईन संवाद साधला.
Congress and NCP are supporting us today, Sharad Pawar and Sonia Gandhi have supported us. But our own people have backstabbed us. We gave tickets to people who could not have won and we made them victorious. Those people have backstabbed us today: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/p24tCCga6t
— ANI (@ANI) June 24, 2022
आमच्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला…
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि , काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज आम्हाला साथ देत आहेत, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. पण आमच्याच लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जे लोक जिंकू शकले नसते त्यांना आम्ही तिकिटे दिली आणि विजयी केले. त्या लोकांनी आज आमच्या पाठीत वार केले. शेराला सव्वाशेर मिळतोच. शिवसेना ही तळपणारी तलवार आहे, ती म्यानात घातली तर गंजते, आणि बाहेर काढली तर तळपते. तीच आता वेळ आली आहे. शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण करीत आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसला आहे. जो शिवसैनिक माझ्यासोबत राहिल त्याच्या सोबतीने मी पुन्हा शिवसेना उभी करेन असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
Many of you might be getting phone calls – some loving & some threatening. I say, har sher ko sava sher milta hi hai. You'll find sava sher in Shiv Sena. Shiv Sena like a sword, if you keep it in sheath,it rusts. If you take it out,it shines. It's time to shine: Uddhav Thackeray pic.twitter.com/HXg4xqeyAl
— ANI (@ANI) June 24, 2022
वर्षावर आता माझा शिवसैनिकच जाईल …
सर्वसामान्य शिवसैनिकांविषयी बोलताना ठाकरे म्हणाले कि , शिवसेना ही मर्दांची सेना आहे. ज्या-ज्या वेळी आपल्याला कोणी आव्हान दिले त्यावेळी आपण त्यांना संपवून पुढे गेलोय. गद्दारांना शिवसेनेत स्थान नाही . तुम्ही निवडून आणलेल्यांना फोडू शकाल, पण निवडून देणाऱ्यांना फोडून दाखवा असे एकनाथ शिंदे आणि भाजपला थेट आव्हान देताना ते म्हणाले कि , वर्षावर आता माझा शिवसैनिक जाईल.
उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितला “तो ” किस्सा …
दरम्यान लोक म्हणतात कि , उद्धव ठाकरे त्यांना या फुटीची कल्पना कशी आली नाही किंवा माहिती कशी मिळाली नाही? याचे ओझरते उत्तर देताना आपल्या परवाच्या फेसबूकलाईव्ह मध्ये ते म्हणाले होते की, कुणी लघु शंकेला जातो म्हणाला तर आपण शंका कशी घायची … याचा अधिक खुलासा करताना ते म्हणाले कि ,
“मला काहीजणांच्या वर्तणुकीविषयी शंका आल्यानंतर मी एकनाथ शिंदेनां बोलवले आणि त्याबद्दल विचारणा केली तेव्हा ते पहिले म्हणाले की , राष्ट्रवादीवाले आपल्याला त्रास देत आहेत नंतर म्हणाले की आपण भाजपसोबत जाऊया असा आमदारांचा दबाव आहे. त्यावर मी म्हटले भाजपकडून आपल्याला तसा प्रस्ताव येऊ देत मग बघू …. पण मातोश्रीची बदनामी, कुटुंबियांची बदनामी करणाऱ्यांच्या सोबत आपण का जायचं? विश्वासघात करणाऱ्या भाजपसोबत आपण का जायचं ? असं मी त्यांना उलट विचारलं आणि त्यांना हे जे कोण म्हणत आहे , त्या आमदारांना घेऊन यायला सांगितलं. आमदार माझ्यासमोर आले असते आणि हे सांगितलं असतं तर ही वेळ आलीच नव्हती.”
https://twitter.com/ANI/status/1540391622944296960
या बंडामागे मी आहे , असा संदेश पोहोचवला जातोय …
आणखी एका अफवेबद्दल बोलताना आणि बंड केलेल्या आमदारांना इशारा देताना उद्धव ठाकरे महणाले कि , “माझ्या तब्येतीचं, आजारपणाचं कारण शोधून तुम्ही जर बंड करणार असाल ते अयोग्य आहे. या बंडाच्या मागे मी आहे असा संदेश पोहोचवला जातोय. मी शिवसेनेमध्ये गद्दारी करणार नाही. आज जर वेगळा तुम्ही गट स्थापन केला, आणि नंतर तो फुटला तर तुमची आमदारकी रद्द होणार. त्यामुळे शिवसेनाही संपेल आणि तुम्हीही संपाल. आज जे निवडून आले आहेत त्यांना पुन्हा निवडून येणं शक्य नाही.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्ती निवडून येतील अशा ठिकाणी आताच्या आमदारांना शिवसैनिकांनी निवडून दिलं. त्या ठिकाणी तुमचा हक्क असतानाही तुम्ही माझा आदेश पाळला आणि त्यांना निवडून दिलं. ज्यांना निवडून दिलं ते आपल्याला सोडून गेले. आजही तुम्हाला सांगतोय की पक्ष चालवायला मी जर योग्य नसेल तर मला तसं सांगा, मी हे पद सोडतो. शिवसेना हा विचार आहे, तो विचार भाजप आता संपवायला निघाला आहे. त्यांना हिंदुत्वाच्या विचारामध्ये भागिदार नको आहे.
When BJP and Shiv Sena were considered untouchables in the name of Hindutva and nobody was ready to go with BJP, Balasaheb said there shouldn't be a division of Hindutva votes. We remained with BJP and we are suffering its consequences now: Maharashtra CM Uddhav Thackeray pic.twitter.com/u7p25R08KL
— ANI (@ANI) June 24, 2022
भाजपला सोबत घेतले त्याचे हे परिणाम आहेत …
जेव्हा हिंदुत्वाच्या नावाखाली भाजप आणि शिवसेना अस्पृश्य मानली जात होती आणि कोणीही भाजपसोबत जायला तयार नव्हते, तेव्हा हिंदुत्वाच्या मतांचे विभाजन होऊ नये, असे बाळासाहेब म्हणाले. आम्ही भाजपसोबत राहिलो आणि त्याचे परिणाम आता भोगत आहोत असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला मारला .