IndiaPoliticalUpdate : “नॅशनल हेराल्ड” प्रकरणी राहुल गांधी यांची “ईडी ” कडून तब्बल १७ तास चौकशी…

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीत मंगळवारी दुसऱ्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची तब्बल १७ तास चौकशी करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उद्या पुन्हा अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे चार तास ईडी कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. यानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले . सुमारे तासाभरानंतर ते पुन्हा ईडी कार्यालयात अधिक चौकशीसाठी पोहोचले. चौकशीचा हा चौथा टप्पा सुमारे सहा तास चालला. यापूर्वी सोमवारीही त्याची १७ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली आहे.
यापूर्वी, ईडीच्या समन्सला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह १०० हून अधिक नेत्यांना पोलिसांनी काँग्रेस कार्यालयाबाहेर ताब्यात घेतले होते. हे सर्वजण राहुल गांधींसोबत ईडी कार्यालयाकडे कूच करण्याचा प्रयत्न करत होते.
पोलिसांनी काँग्रेस कार्यालय आणि ईडी मुख्यालयाभोवती कलम १४४ लागू केले आहे आणि विस्तृत सुरक्षा व्यवस्था केली आहे. तेथे पोलीस आणि निमलष्करी जवान तैनात करण्यात आले आहेत. दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल करत भाजप नेत्यांची नावे विचारली, ईडी हिमंता विश्व सरमा किंवा येडियुरप्पा यांना का बोलावत नाही?
Enforcement Directorate asks Congress leader Rahul Gandhi to rejoin the National Herald investigation tomorrow for the third consecutive day: Sources
(file pic) pic.twitter.com/a2vpzyqtCt
— ANI (@ANI) June 14, 2022
काँग्रेसचा सरकारवर आरोप
सुरजेवाला म्हणाले की, राहुल गांधींच्या विरोधात ईडीची चौकशी हा त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे कारण त्यांनी आमच्या भूभागावर चीनचा कब्जा, महागाई, इंधनाच्या किमती वाढणे, बेरोजगारी, धार्मिक सूड यासारख्या मुद्द्यांवर मोदी सरकारला नेहमी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सुरजेवाला पुढे म्हणाले की, भाजप मीडिया आणि व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचा वापर करत आहे. पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींचे एजंट बनून त्यांना परदेशात कंत्राट मिळवून देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, राहुल गांधी, तुम्ही जनतेचा आवाज बुलंद करता म्हणून भाजपने हल्लाबोल केल्याची घटनाक्रम समजून घ्या. राहुल त्यांच्या डोळ्यात बघून सरकारला सवाल करतात. हा हल्ला केवळ राहुल आणि काँग्रेसवर नसून बेरोजगार आणि गरीबांवर आहे, असे काँग्रेस प्रवक्ते म्हणाले.
नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने राहुल गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. या चौकशी सत्ताधारी भाजपच्या सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दोन दिवसांत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आतापर्यंत १७ तासांहून अधिक चौकशी केली असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांना उद्या पुन्हा अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.